Wednesday 25 July, 2007

भाषा..........

घरात एखादं लहान मुल दुड्दुडत असेल तर त्या घरातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण कसा जिवंत होतो. त्यात नुकतंच बोलायला शिकत असेल तर बघायलाच नको. सध्या तेच चालू आहे. हे आमचं पिल्लू इतक्या पटकन भाषा आत्मसात करतं आहे की नुसती धमाल चालू आहे. (जाता जाता गुजराती भाषेत दंगलीला धमाल म्हणतात ! त्याही अर्थाने फार काही वेगळं नाही)

आम्ही सध्या बहुभाषिक वातावरणात राह्तोय. घरातली भाषा, शेजारच्या लोकांची भाषा, सगळ्यांना सोयीची म्हणून एक सामायिक भाषा, घरात अखंड चालू असलेली बालगीते, गोष्टी यातली अलंकारीक भाषा आणि आजची विश्वभाषा यातून काय नक्की होत असेल त्या चिमुकल्या मेंदूत कोणजाणे.

तोपर्यंत, तेत माताईच्या गयात.
अईन हई?
ईशू .....
दितामाशी
पा..
संदाशात...
पुई..
ताशव झोप्पा..
मो...
घशल, घशल, घशल
अशद याव
पईन, पुपेश, ताआद, दंग, अंती, सा
पंपू शाब्बाची शीदी..
चांमा
इवी तांद्नी, खिक्कीतून

कळ्लं ना?

No comments: