Showing posts with label भाषा. Show all posts
Showing posts with label भाषा. Show all posts

Friday, 6 July 2007

मायबोली............

भाषा आपल्या भावजीवनात किती महत्वाची आहे ते आपल्या लक्शात सुद्धा येत नाही. अमराठी वातावरणात राह्यल की खूप जाणवत. बाकी भाषा कितीही छान येत असल्या तरी मराठीत लिहिता वाचताना काहि वेगळच वाटत. हा ब्लोग सुरू करताना मराठीत लिहिता येईल आणि गप्पा मारता येतील हे आहेच डोक्यात. (उगाच ताकाला जाऊन भान्डे कशाला लपवा, नाही का?)

असे असुनही पहिल्या दोन पोस्टस इन्ग्रजीत! असु द्या हो. तीही एक छान भाषा आहेच की. काही अभि्व्यक्तीसाठि तीच शोभते.

ता.क. वरिल विधानाना जर काही राजकीय वास येत असेल तर तो निव्वळ अपघात आहे.